मोहिनीराज प्रकाशन डोंबिविली (पश्चिम) या शासन मान्य संस्थेतर्फे " मोहिनीराज" मराठी त्रेमासिक निर्मिती माहे १९ जून १९८९ पासून करण्यात आले आहे. या मासिकात प्रमुख संपादक श्री सुभाष झेंडे व कार्यकारी संपादक सौ सुरेखा झेंडे या काम पाहत असतात. या संस्थेचे सर्वेसर्वा श्री सुभाष झेंडे, सन १९६७ पासून निम शासकीय सेवेत एकूण ३ ५ वर्ष सेवा करून सन डिसेंबर २००१ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त, २ ५ ० वर लघुकथा प्रसिद्ध, तीन कथासंग्रह - "अनोळखी वाटा", "उंबरठा", व "टर्निंग पॉईंट" प्रसिद्ध व एक कादंबरी "प्रतिशोध "प्रसिद्ध झाले आहे .
त्यांनी या मासिकामार्फत प्रथित यश लेखकाप्रमाणे नवोदित साहित्यिकांना संधी उपलब्ध करून दिली जाते. नवोदित लेखक, कवी, कलावंत इत्यादीसाठी वेळोवेळी शिबीर कार्यशाळा यांचे आयोजन केले जाते. नवोदित कवींसाठी काव्य वाचनाचा कार्यक्रम , लेखांसाठी कथाकथनाचा कार्यक्रम, प्रकाशन समारंभ व स्थानिक उपक्रम पण या संस्थेमार्फत राबविले जात आहेत . नवोदित गायक व गायिका यांच्यासाठी स्टेज उपलब्ध करून दिले जाते . निरनिराळ्या स्पर्धेमध्ये परीक्षक व समीक्षक बोलविण्यात येतात व निपक्ष निकालाद्वारे गौरव करण्यात येतो.
सदर मासिक स्त्री पुरुष आबालवृद्ध याना वाचनीय आहे . या मासिकात साहित्याबरोबर ज्ञान विज्ञान मनोरंजन प्रौढ शिक्षण आरोग्य विषयक बाबी, कथा कविता वैचारिक लेख ई . उपयुक्त माहिती प्रकाशित केली जाते.
मोहिनीराज प्रकाशन संस्था हि १ ९ ८ ९ सालापासून डोंबिविली या संस्कृतीत शहरात कार्यरत आहेत . आम्ही आतापर्यंत दहा हजार नवोदित लेखक व कवी याना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे . अजूनही आमचे मासिक व पुस्तक प्रकाशनाचा उपक्रम डोंबिवली व मुंबई परिसरातील अनेक नामवंत यादीत आमचे प्रकाशनाचे कार्य अजोड आहे . आतापर्यंत आम्ही २ ५ ० पुस्तके प्रसिद्ध केले आहे .
मोहिनीराज प्रकाशन संस्थेचे सेवा कार्य संपूर्ण महाराष्ट्र व इतर प्रांतात वाढावे व युवक व युवतींवर चांगले संस्कार व्हावेत, संपूर्ण साहित्य चळवळ व मराठी भाषेला चांगले दिवस या सर्व बाबीसाठी मोहिनीराज प्रकाशन संस्था गेल्या ३५ वर्षांपासून चांगल्या प्रकारे कार्य करत आहे .
मोहिनीराज प्रकाशन या संस्थे मार्फत आम्ही मोहिनीराज त्रैमासिक प्रकाशित करत असतो व त्या व्यतिरिक्त सॅन १ ९ ९ ८ पासून पुस्तक प्रकाशन व्यवसाय करावयास सुरवात केली आहे. या पुस्तक प्रकाशनासाठी चांगला वाव मिळाला. अनेक नवोदित साहित्यिकांची आम्ही पुस्तके प्रसिद्ध केली आहे व हे काम निरंतर करीत आहोत .
नवोदित साहित्यिकांना आत्ता पर्यंत हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या वाटचालीत आम्हास अनेक प्रथितयश, नामांकित लेखक , कादंबरीकार, गझलकार , समीक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. आमच्या आतापर्यंतच्या वाटचालीत ज्येष्ठ समीक्षक सौ अन्जली बापट , श्रीमती पद्मावती जावळे, गझलकार श्री किरण जोगळेकर , मा . श्री अशोक नायगावकर , श्री अरुण म्हात्रे , आदी नामवंत साहित्यिकांनी आमच्या प्रकाशन संस्थेस अत्यंत बहुमोल सहकार्य केले व वेळोवेळी मार्गदर्शनाच लाभ आम्हास झाला . आज हे मूर्त स्वरूप आपणास दिसत आहे.
मोहिनीराज मासिक वितरण व्यवस्थेमध्ये आम्ही वेगवेगळ्या संस्थांशी आमचा नियमित संपर्क आहे . पुस्तकांचे वितरण आम्ही मुंबई , ठाणे , पुणे, नाशिक, रायगड, अ . नगर, धुळे जळगाव ई . जिल्यामधून केले जाते . आमच्या पुस्तकाचे छपाईचे कमीत कमी एक हजार पुस्तके आमच्या संस्थेकडून प्रसिद्ध व्हावी असे आम्हास वाटते .
आमच्या प्रकाशाने व मासिक विविध संस्थांमार्फत आस पर्यंत १ ९ पुरस्कार प्राप्त झाले आहे . त्याचा आम्हास अभिमान आहे . सध्या टी . व्ही . मोबाईल व डिजिटल या संस्कृतीमुळे वाचन पूर्णपणे बंद होत चालले आहे . "वाचाल तर वाचाल" अशी वेळ आली आहे . तेंव्हा कुटुंबात व परिसरात, सोसायटीत वाचनाची गोडी निर्माण करा . तरुण पिढीपुढे चांगले संस्कार टिकून राहिले पाहिजे. मराठी वाचनाची सवय टिकवून ठेवली पाहिजे. भविष्यात कौटुंबिक जीवन सुखी, समृद्ध समाधानी होण्यासाठी मोहिनीराज संस्था २ ०२ ५ पासून ऑनलाईन माध्यमाद्वारे नवोदित लेखक , कवी व कलावंत याना व्यासपीठ मोहिनीराज या वेब साईटद्वारे उपलब्ध करत आहे. मराठी साहित्याची चळवळ व वाचनाची आवड फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता भारत व इतर देशांपर्यंत पोहचावे याचा प्रयत्न करत आहे .
मोहिनीराज प्रकाशन द्वारे प्रकशित नवोदित साहित्य लाभ घेण्यासाठी आपली मागणी नोंदवा व आजच वर्गणीची फॉर्म भरा . आपल्या सर्वांच्या सहकार्यातूनच आमची अवघड वाट सुकर करीत आहोत .
-संस्थापक व संपादक
श्री सुभाष झेंडे .
Sign up to hear from us about specials, sales, and events.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.